संत संभाजी महाराज आरती
आरती संभाजीची !
पुर्ण ब्रम्ह स्वरूपाची !!
कामारीच्या जनतेची !
आस पुरवावी साची !! ध्रृ!!
गोपीनाथ दत्तकाची !
सेवा घेऊनीया साची !!
निजा नंद आनंदाची !
मुद्गा दिली नातवाची !!१!!
परंपरा साधुरिती !
संभाजीचे पाय चित्ती !!
भक्ती करी मंदिराची !
अखंतीत भागवताची !!२!!
चैत्र मासी आष्टमीला !
प्रति वर्षी होतो काला !!
लाही त्या भक्ती भाऊची
आरती गाऊ श्री संताची !! ३ !!