उठा जागे व्हारे आता ।

फोटो संत संभाजी महाराज टाकणे…/गोपिनाथ म. साधू महाराज यांचा फोटो टाकणे….homepage

संतांच्या कामगिरीविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे. आजही त्याविषयी चर्चा झडतच आहेत. यावरून संतप्रभाव चांगल्या प्रकारे प्रत्ययास येतो. कोणताही पूर्वग्रह न ठेवता संतांच्या कामगिरीविषयी पुढीलप्रमाणे सांगता येईल, असे मला वाटते. संतांचे मुख्य लक्ष्य हे पारलौकिक हित हेच होते. आणि याच लक्ष्याचा  त्यांनी समाजात प्रचार केला.ऐहिक सुख हे त्यांचे मुख्य लक्ष्य कधीच नव्हते. ‘अवघाची  संसार सुखाचा करीन’ अशी काही वचणे पुढे करून विचारवंतांनी वाचकांची दिशाभूल करू नये. संसार, स्त्री, ऐहिक सुखोपभोग या बाबतीत संतांनी टोकाचे नकारात्मक विचार व्यक्त केले आहेत. आणि तेही अनेकवेळा. त्यामुळे ‘संसार हा असार आहे’ हेच संतविचाराचे सार आहे, हे मान्य करण्यात अडचण येऊ नये.
वरीलप्रमाणे विचार करताना संतांनी बऱ्याच प्रमाणात परंपरेच्या विरुद्ध विचार आणि कृती केल्या.आध्यात्मिक पातळीवर का होईना समता,बंधुता,भूतदया, औदार्य अशा तत्त्वांचा पुरस्कार केला. त्याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष व्यावहारिक जीवनावरही प्रभाव पडला असणारच. लोक आध्यात्मिक मार्गाद्वारे जागृत झाले. त्यामुळेच या संत मंडळीत अठरापगड जातींचा समावेश होऊ शकला. जनसामान्यांत अशी चेतना निर्माण करणे ही त्या काळाची गरजच होती. आणि संतांनी आपल्या कार्याद्वारे ती  पूर्ण केली.
जरी विठ्ठलप्राप्ती हे संतांचे मुख्य गंतव्य असले तरी त्याकडे जाणारी संतांची वाट ही समता, भूतदया, करुणा,परोपकार,औदार्य या मैदानातूनच जात होती. या मार्गाने  विठ्ठलप्रप्ती जरी झाली नाही तरी त्या वाटेने जाताना समाजाचे एकंदर हितच झाले, हे आपण मान्य करायला हरकत नाही.
ऐहिक सुखाचे आपण फार कौतुक करीत असलो तरी या ऐहिक सुखाच्या अभिलाषेने माणूस आपले माणूसपण विसरत चालला आहे. आपल्या या सुखासाठी तो वाट्टेल ते करायला तयार आहे. त्यामुळे समाजात अशांती, अविश्वास, संघर्ष, मानसिक तणाव निर्माण होत आहेत. तसेच निसर्गाचे शोषण व पर्यावरणाची हानी झाल्याशिवाय आपल्याला तथाकथित सुख देणारा विकासही  होऊ शकत नाही.
मानवजातीला या संकटातून वाचविण्यासाठी आपल्या गरजा नियंत्रित करणे, नैसर्गिक साधनसंपत्तीचा संयमित उपयोग करणे, आपापसातील विश्वास व प्रेम वाढविणे या बाबींची गरज आहे. या साठी संत विचार आणि कार्य प्रेरक ठरतील. या अर्थाने संतांची प्रासंगिकता आपण लक्षात घेतली पाहिजे. संतांच्या विचार व कार्यावर अपेक्षांचे  अवाजवी ओझे टाकणे आणि आधुनिक ओझे त्यांना पेलता येणार नाहीत, अशी टीका करण्याची आपणास काहीही आवश्यकता नाही.

पुण्य फळले बहुतां दिवसा ।
भाग्य उदयाचा ठसा ।।
झालो सन्मुख तो कैसा ।
संतचरण पावलो ।।
संत तुकाराम महाराज

यामधून हाच सारांश अनंत दृष्टिगोचर होतो की, अनंत जन्मातून केलेले पुण्य फळाला आल्यानंतर संत मिळतात असे थोर अधिकारी सद्‌गुरू मिळाल्यास ते प्रथम आपणांस जागृत करतात अर्थात अज्ञानरुप घोर निद्रेतून उठण्यास सांगतात. व भक्ति मार्गाला लावतात. संत संभाजी बापूनी कामारीसह परीसरातील सर्व नागरिकांना भक्तिमार्गाला लावले आहे.

उठा जागे व्हारे आता ।
स्मरण करा पंढरीनाथा ।
भावे चरणी ठेवा माथा ।
चुकवा व्यथा जन्माच्या ।।
संत तुकाराम महाराज

उठा उठा जागा पाठी भय आले मोठे ।
पंढरीवाचुनी दुजा ठाव नाही कोठे ।।

अनादिअनंत परमदयाधन परमेश्वराचे प्रत्येक विधान हे मंगलमय आहे कारण तो स्वयं मंगलस्वरूप आहे. अशा प्रकारचा उल्लेख स्वयं शास्त्र करतात.
मंगलं भगवान विष्णु… मंगलं गरुडध्वज… अथवा म“लायतनो हरि…
मंगलस्वरुप परमात्म्याने केलेली म मानवसृष्टी सुध्दा मंगलमय होय.  ईश्वरदत्त मानवजीवन अतिशय अमूल्य असे आहे. व्यŠतला जीवनाचे मूल्य सद्‌विचारवंताच्या सन्निकटतेमधून प्राप्त होते थोर महापुरुषाचे सानिध्य मनुष्याच्या अंधकारमय जीवनाला प्रकाशमय बनविते प्रकाशमयताच जीवनाची अनमोल पुंजी आहे जीवन प्रकाशमय होणे हेच जीवनाचे सार रहस्य आहे त्या रहस्याप्रत पोहचण्याकरिता प्रत्येकाला एका श्रेष्ठ मार्गदर्शकाची नितांत गरज असते तो मार्गदर्शक म्हणजे ज्ञानदाता सद्‌गुरू अर्थात आचार्य होय आपण जर आचार्य चरणचंचरिक झालो तर तेच आपणांस प्रथम मार्गदर्शन करतील आपल्या ठरवलेल्या मार्गाला दाखवतील योग्य मार्गाचे दिग्दर्शन करतील व स्पष्ट सांगतील.

तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्युर्मा अमृतं गमय । इति ।।

हे ज्ञानमार्ग पथिक साधका ! अरे ! तू असताकडे न जाता सत्याकडे जा तसेच अंधकाराकडे अर्थात घोर अशा अंधकारस्वरुप अज्ञानाकडे न जाता प्रकाशाकडे जा कारण प्रकाश तुझे जीवन आहे तुझी चेतना आहे तू स्वयं प्रकाश आहेस प्रकाशच तुझ्या दिव्य जीवनाचा स्त्रोत आहे परंतु तुझे दिव्यत्त्व अंधकारात दडलेले आहे, ते प्रकाशानेच प्रत्ययाला येईल अरे सज्जन पुरुषा ! किती दिवस तू या अनादिअज्ञानमय कष्टप्रद प्रपंचाचा संग करणार? त्या मध्येच तू किती वेळा विनाष्ट झाला व उदायास आला म्हणून तात्त्विक विचाराच्या दृष्टीकोणातून बघ, दृष्टि उघड, प्रकाश मिळेल अन्यथा बहुमूल्य जीवनास तू कायमचा मुकशील कारण ख्ऐसो जनम नहीं बारंबार हे पवित्र जीवन तुला एक अनमोल रत्नस्वरुप मिळाले आहे त्याची जाणीव ठेव, कदर कर, तू तर चिरंतन सुखसाम्राज्याचा उत्तम अधिकारी आहेस परंतु अशा प्रकारच्या ज्ञानाविषयी तू अनभिज्ञ आहेस ती अनभिज्ञता काढून टाकावयाची झाल्यास तुला तत्त्वज्ञात्या आचार्याला शरणापन्न व्हावे लागेल आत्मियतेने त्यांची शुश्रुषा करावी लागेल त्यावेळी तुला आत्मप्रकाशाची अनुभूति मिळेल चित्ताला लागलेली अंधकाराची मलीनता स्वच्छ धुऊन निघेल व जीवन प्रकाशरुपाने म्हणजे ज्ञानरुपाने परिवर्तीत होईल प्रकाशमय परिवर्तनच तुझ्या जीवनाचे परमसाध्य होय वरील निष्कर्षावरुन हेच निष्पन्न झाले की, आचार्य अशाप्रकारे साधकाचे पथदर्शक होतात त्यांच्या बोधातूनच साधकाला स्वत:ची हरवलेली दृष्टी पुनश्च प्राप्त होते.

साधुबोध हाच कल्याणमय जीवनाचे पावनसूत्र होय तो बोध मिळविण्याकरिता साधकाने सतत प्रयत्नशिल राहावयास पाहिजे कारण जो पर्यंत ज्ञान मिळत नाही तो पर्यंत आपण अज्ञानाच्या घोर निद्रेतच राहणार जीवनात बोध मिळणे हीच खरी जागृती आहे परंतु जागृतीचा बोध सद्‌गुरुशिवाय मिळत नाही सद्‌गुरु परमभाग्याशिवाय मिळत नाहीत संत श्री तुकाराम महाराजांनी याविषयी स्पष्ट उल्लेख केला आहे.